पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहा मार्च रोजी पुणे दौर्‍यावर येणार आहेत. या दौऱ्यात मेट्रोचे उद्घाटन, जायका प्रकल्पाचे भूमिपूजन यासह विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले जाणार आहेत. मात्र त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कार्यक्रमा दरम्यान आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुण्यात राष्ट्रवादी आंदोलनाने स्वागत करणार हे निश्चित आहे.

आगामी महापालिका निवडणुक लक्षात घेता, पुणे शहरातील बहुप्रतीक्षित असलेल्या मेट्रोचे आनंदनगर ते गरवारे महाविद्यालय पर्यंतच्या टप्प्याचे उदघाटन, पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अशा पुतळ्याचे अनावरण, जायका या प्रकल्पासह अनेक कामांचे उदघाटन आणि भूमिपूजन, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. तसेच लवळे येथील सिम्बॉयसिस महाविद्यालय येथे कार्यक्रमास उपस्थित राहणार असून त्याच दरम्यान कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर उपस्थित जनसमुदायाला ते संबोधित करणार आहेत.

Jayant Patil on Amit Shah
“पक्ष फोडणाऱ्यांनीच ठरवलं कोण नकली, पण जनता..”, जयंत पाटील यांची अमित शाहांवर टीका
Shivsena, NCP, Mahavikas Aghadi,
महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा, काँग्रेसची फरफट, नाराजीची पटोलेंकडून कबुली
NCP, sanjay Raut, sangli,
सांगलीत संजय राऊत यांच्या मदतीला राष्ट्रवादी का धावून गेली ?
Suresh taware, NCP,
मविआत निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने केला उमेदवार जाहीर, काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांचा आरोप

या संपूर्ण कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार,महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्री, खासदार,आमदार आणि विविध क्षेत्रातील मंडळी हजेरी लावणार आहेत. मात्र त्या कार्यक्रमापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विरोध दर्शविला आहे.

त्याबाबत शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी लोकसत्ता डॉटच्या प्रतिनिधीने संवाद साधला असता ते म्हणाले की, “मागील सात वर्षात केंद्र सरकारने आणि पुणे महापालिकेतील भाजपने पुणेकर नागरिकांची घोर निराशा केली आहे. कोणतेही प्रकल्प पूर्णत्वाकडे घेऊन गेले नाही. आनंदनगर ते गरवारे महाविद्यालय पर्यंतच्या ५ किलोमीटर मेट्रोचे उदघाटन होणार आहे. नदी सुधार प्रकल्प जायकाचे भूमिपूजन केले जाणार आहे. या प्रकल्पाची त्यांनी सात वर्षापूर्वीच घोषणा केली होती, पण त्याचे भूमिपूजन आता करणार आहेत.”

या सर्व अर्धवट कामांचा निषेध म्हणून आम्ही सहा तारखेला आंदोलन करणार आहोत. त्याबाबत लवकरच ठिकाण आणि वेळ जाहीर करू. मात्र, ज्या पुणेकर नागरिकांनी तुम्हाला भरभरून दिले. त्यांना अर्धवट कामांची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी देत आहेत, त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत. तसेच राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल जे विधान केले त्याचा आम्ही यापुर्वी निषेध केला असून पुन्हा आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.