पुणे: विश्वासाने पुतण्याला घराच्या आणि कपाटाच्या चाव्या दिल्या. त्याने काकूचे लक्ष नसताना कपाटातील २५ लाख ७२ हजारांची रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने चोरले, तसेच बँक खात्यातील ५० लाख रुपये रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी प्रितम प्रवीणचंद्र दर्डा (रा. शुक्रवार पेठ) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजया प्रकाशचंद्र दर्डा (वय ७०,रा. शुक्रवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा… ललित पाटीलला ससूनमधून पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या सहाच आरोपींविरुद्ध आरोपपत्र; अन्य आरोपींविरुद्ध का नाही?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजया दर्डा यांच्या पतीचे २०१८ मध्ये निधन झाले होते. आरोपी प्रितम हा काकू विजया यांच्याकडे राहायला आहे. विजया यांनी प्रितमकडे विश्वासाने घर आणि कपाटाच्या चाव्या दिल्या होत्या. प्रितमने ५९ तोळे सोन्याचे दागिने आणि २५ लाख ७२ हजार ५०० रुपये रोख रक्कमेचा अपहार केला. तसेच आधारकार्ड बँक खात्याशी जोडायच असल्याची बतावणी करुन काकाच्या मोबाइल क्रमाकांचा गैरवापर करुन बँक खात्यातून परस्पर ५० लाख रुपये वेळोवेळी काढले, असे विजया यांनी फिर्यादीत म्हटले आहे.