पुणे: अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला ससून रूग्णालयातून पसार होण्यासाठी मदत करणाऱ्या सहा आरोपींविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात मंगळवारी आरोपपत्र दाखल केले.

दत्तात्रय ढोके (वय ४०, रा. हडपसर), अर्चना निकम (वय ३३), ॲड. प्रज्ञा कांबळे (वय ३९), भूषण पाटील (वय ३४) अभिषेक बलकवडे (वय ३१, चाैघे रा. नाशिक), रोझरी एज्युकेशन ग्रुपचा भागीदार विनय आराहाना (वय ५०, रा.लष्कर) अशी आरोपपत्र दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या अन्य आठ आरोपींची चौकशी सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

हेही वाचा… धक्कादायक! चेष्टा मस्करी जीवावर बेतली; काॅम्प्रेसर पाइपमधील हवा पोटात सोडल्याने १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

आरोपी विनय आराहानाच्या सांगण्यावरून त्याचा मोटारचालक दत्तात्रय ढोके याने ललित पाटील ससून रूग्णालयातून पसार झाल्यानंतर त्याला दहा हजार रुपये मोबाइल संच खरेदीसाठी दिले होते. ललितचा भाऊ भूषण त्याच्या संपर्कात होता. पुण्यातून पसार झाल्यानंतर ललित नाशिकला गेला. तेथे त्याची मैत्रीण अर्चना निकमच्या घरी तो थांबला. ललितची मैत्रीण प्रज्ञा कांबळे त्याच्या संपर्कात होती. पाटीलने तिला मोठी रक्कम दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ललित ससून रूग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी पोलिासंनी चौदा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यापैकी सहा आरोपींविरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात मंगळवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले. पाटील २ ऑक्टोबर रोजी ससून रूग्णालयातील वाॅर्ड क्रमांक १६ मधून पसार झाला होता. साकीनाका पोलिसांनी पाटीला बंगळुरुतून अटक केली होती. ललित ससूनमधून पसार झाल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.