पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच नागरिकांच्या सहभागातून ही नगरपालिका विकास कामांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील मालमत्ता कर व मुलभूत सोयी सुविधांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीस माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह या दोन्ही गावांतील स्थानिक नागरिक उपस्थित होते.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, “फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील नागरिकांनी आपली नगरपालिका राज्यातील सर्वोत्कृष्ट अशी नगरपालिका ठरावी, यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसेच पुणे नगरपालिकेने या दोन्ही गावांत नागरी सुविधांशी संबंधित सुरू केलेल्या प्रकल्प, योजनामंध्ये सहकार्य देणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

हेही वाचा- पिंपरी- चिंचवड की बिहार! अज्ञातांनी तीन ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत हवेत झाडल्या ८ गोळ्या, घटना सीसीटिव्हीत कैद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे महानगरपालिकेमध्ये २०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यामध्ये या फुरसुंगी आणि उरूळी देवाची या गावांचा समावेश होता. या दोन्ही गावांची मिळून सुमारे अडीच लाख इतकी लोकसंख्या आहे. ही बाब लक्षात घेता, या दोन गावांना नवीन नगरपालिका देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आला आहे.