पिंपरी- चिंचवड शहरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी गोळीबाराची घटना घडली आहे. पिस्तूलातून सात ते आठ गोळ्या झाडल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून मद्यधुंद अवस्थेत अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितल आहे. एका रिक्षातून येऊन गोळीबार करण्यात आला आहे. शाहरुख शहनवाज शेख आणि त्याच्या इतर तीन साथीदार यात सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
पिंपरी- चिंचवड शहरातील मध्यवर्ती असलेलं ठिकाण पिंपरी भाट नगर, लिंक रोड पत्राशेड आणि चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार अज्ञात व्यक्तींनी मद्यधुंद अवस्थेत हवेत गोळीबार केला आहे. अगोदर रॉबरीच्या उद्देशाने हा गोळीबार केल्याचं सांगितलं जातं होत. पण, अद्याप गोळीबाराच कारण समजू शकलेलं नाही. तिन्ही घटनास्थळी पिंपरी पोलीस, चिंचवड पोलिस, गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखा युनिट दाखल झाले आहेत. नेमका हा गोळीबार रॉबरी च्या उद्देशाने केला आहे की आणखी काही कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत.