पुणे : लाइफ सेव्हिंग फाउंडेशन, वाहतूक पोलीस शाखा आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार यांच्या वतीने सोमवारी (१२ डिसेंबर) ‘नो हाँकिंग डे’ अर्थात पुण्यात ‘हॉर्न ठेवा एक दिवस बंद’ अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. विविध प्रमुख चौकांमध्ये एकाच वेळी नो हाँकिंग डे उपक्रम होणार आहे. टिळक चौक येथे सोमवारी सकाळी नऊ वाजता मुख्य जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहे.

हेही वाचा >>> पुणे: पुण्याला शेती क्षेत्राचे पाणी द्या; महापालिकेची जलसंपदा विभागाकडे मागणी

शहरातील विविध चौकांमध्ये ही मोहीम पार पाडली जाईल, अशी माहिती लाइफ सेव्हिंग फाउंडेशनचे देवेंद्र पाठक यांनी सोमवारी दिली. मकरंद टिल्लू, प्रा. पद्माकर पुंडे या वेळी उपस्थित होते. पुण्यात दररोज साधारणतः एक कोटीपेक्षा अधिक वेळा हॉर्न वाजवला जातो. यातील ९० टक्के हॉर्न हे अनावश्यक असतात. वाहतूक कोंडीत अडकल्यावर अशा अनावश्यक हॉर्नमुळे नागरिकांना बऱ्याचशा दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नो हॉर्न या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे पाठक यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.