आता दळणही महागणार; १ जूनपासून नवीन दर होणार लागू

विजेच्या दरात झालेली वाढ आणि पीठ गिरणी साहित्याच्या दरामध्ये झालेली वाढ याचा विचार करून दळणाच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे.

प्रातिनिधीक फोटो

मागील काही काळापासून देशात महागाई वाढतच चालली आहे. इंधानाचे दर गगनाला भीडत असताना, खाद्य पदार्थ्यांच्या महागाई दराने सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. यानंतर आता चपाती किंवा भाकरी यासाठी आवश्यक असणारं पीठही महाग होणार आहे.

देशात वाढलेली महागाई, विजेच्या दरात झालेली वाढ आणि पीठ गिरणी साहित्याच्या दरामध्ये झालेली वाढ याचा विचार करून दळणाच्या दरामध्ये प्रतिकिलो एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. एक जूनपासून प्रतिकिलो दळणासाठी आठ रुपये आकारण्यात येणार आहेत.

पुणे शहर जिल्हा पीठ गिरणी मालक संघाचे अध्यक्ष लुईस सांगळे यांनी ही माहिती दिली. संघाच्या नुकत्याच झालेल्या सभेमध्ये दळणाच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी दळणाचा दर प्रतिकिलो सात रुपये होता. त्यामध्ये एक रुपयाची वाढ करून तो आता आठ रुपये करण्यात आला आहे. या सभेस संघाचे सचिव प्रकाश कर्डिले, दिलीप रणनवरे, अमोल मेमाणे, प्रवीण बारमुख, प्रमोद वालेकर, गणेश गोरे, राजू चांदेकर, सुरेश वाळके आणि शिवाजी ठकार उपस्थित होते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Now grain grinding rate will hike from june 1 by 1 rupee pune print news rmm

Next Story
आगामी साहित्य संमेलन वर्ध्याला, साहित्य महामंडळाच्या उद्याच्या बैठकीत शिक्कामोर्तब
फोटो गॅलरी