पुणे : अनेकजण मोटारींना आवडीचा क्रमांक मिळविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करीत आहेत. मोटारींसाठीच्या नवीन क्रमांकाच्या मालिकेत लिलावात लाखोंची बोली लावून आकर्षक क्रमांकाची अनेकांनी खरेदी केली. प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) झालेल्या लिलावात ९ क्रमांकाला सर्वाधिक बोली लावण्यात आली. एका व्यक्तीने या क्रमांकासाठी ४ लाख ११ हजार रुपये खर्च केले आहेत.
आरटीओकडून दुचाकी अथवा मोटारींसाठी नवीन क्रमांकांची मालिका सुरू करण्याआधी त्यातील आकर्षक क्रमांकांची विक्री केली जाते. त्यासाठी क्रमांकानुसार १५ हजार रुपये ते ४ लाख रुपये शुल्क असते. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्या क्रमांकांचा लिलाव केला जातो. त्यात जास्त बोली लावणाऱ्यास तो क्रमांक दिला जातो. हा लिलाव नुकताच आरटीओमध्ये झाला.
हेही वाचा – पुणे अन् पिंपरी-चिंचवडकरांसाठी सुटीचा दिवस ठरतोय ‘मेट्रोवार’
या लिलावात ९ क्रमांकाला सर्वाधिक २ लाख ६१ हजार रुपयांची बोली लावण्यात आली. या क्रमांकासाठी १ लाख ५० हजार रुपयांचे शुल्क असून, मोटार मालकाला यासाठी एकूण ४ लाख ११ हजार रुपये भरावे लागले. एक क्रमांकाला चार लाख रुपयांचे शुल्क आहे. या क्रमांकासाठी एकच अर्ज आल्याने हा क्रमांक त्या मोटारमालकाला तेवढ्याच शुल्कात मिळाला. त्यानंतर ९९९९ या क्रमांकासाठी ७० हजार रुपयांची बोली लावण्यात आली. या क्रमांकासाठी १ लाख ५० हजार रुपयांचे शुल्क असल्याने मोटारलमालकाला एकूण २ लाख २० हजार रुपये भरावे लागले, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.
हेही वाचा – पुण्यात कालिचरण महाराजांविरुद्ध गुन्हा… ‘हे’ आहे कारण
सर्वाधिक बोली (आकडे रुपयांमध्ये)
क्रमांक – बोली – शुल्क
०००९ – २,६१,०० – १,५०,०००
०००१ – बोली नाही – ४,००,०००
०००५ – १,५१,००० – ५०,०००
७७७७ – १,३०,००० – ७०,०००
०००७ – १,२७,०० – ५०,०००