लोणावळामध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पहाटे देवले पुलाजवळ कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो ट्रकवर आदळून अपघात झाला. या अपघातात टेम्पोतील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

इजाक रसूल मुगले (वय ४२, रा. मदिनानगर, उमरगा, जि. उस्मानबाद) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघातात इरफान जब्बार मकाने (वय २५), नागेश काशीनाथ करमुखले (वय ३२, दोघे रा. शिळफाटा, जि. ठाणे) हे जखमी ‌झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो ट्रकवर आदळला

द्रुतगती मार्गावरुन पहाटे साडेपाचच्या सुमारास कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो मुंबईकडे जात होता. त्यावेळी भरधाव टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो ट्रकवर पाठीमागून आदळला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : पुण्यात भांडणे सोडविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मनगटाचा चावा, एकाला अटक

अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने द्रुतगती मार्गावरील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच मुगले यांचा मृत्यू झाला होता. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मकाने, करमुखले यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली.