पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील जांभुळवाडी पुलाचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. जांभुळवाडी पुलावरील साताऱ्याकडे एक मार्गिका वाहतुकीसाठी २० जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जांभुळवाडी पुलाचे काम (एक्सपान्शन जॉइंट) काम सुरू करण्यात आले आहे. पुलाच्या परिसरातील तीन मार्गिकांपैकी एक मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. उर्वरित दोन मार्गिकेवरुन साताऱ्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत ठेवण्यात येणार आहे.
२० जानेवारीपर्यंत पुलाचे काम सुरू राहणार असून, वाहनचालकांनी वाहतूक बदलांची नोंद घ्यावी, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.