पुणे शहरात मागील चार दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. त्याच दरम्यान आज(शनिवार) सकाळी शुक्रवार पेठेतील ८० वर्ष जुना वाडयाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत अडकलेल्या सहा जणांना बाहेर काढण्यात अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.
खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पाणीसाठा २१ टक्क्यांवर; धरणक्षेत्रांत दमदार पाऊस कायम
अग्निशामक विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार पेठेतील नेहरु चौक येथील ८० वर्ष जुना असलेला कारंडे यांच्या तीन मजली वाडयाचा काही भाग कोसळला आहे. अशी माहिती आम्हाला सात वाजून पंधरा मिनिटांनी मिळाली. त्यानंतर आम्ही पुढील पाच मिनिटात घटनास्थळी पोहचलो. त्या वाड्यात तीन जणांचं कुटुंब राहण्यास आहे. त्यापैकी सहा जण दुसर्या मजल्यावर अडकून पडले होते. त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असल्याचे त्यांनी सांगितले.