पिंपरी – चिंचवड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी ऍक्टिव्ह झाले आहेत. गणेशोत्सवानिमित्त पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांच्या घरी जाऊन गणपती बाप्पांच दर्शन घेऊन आरती केली. महानगर पालिकेत देखील पार्थ पवार यांनी दर्शन घेऊन बाप्पांची आरती केली.
पार्थ पवार यांनी २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नशीब अजमावले होते. मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांनी निवडणूक लढवली. अजित पवार यांनी पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. परंतु, त्यांचा मावळ लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. आता तेच पार्थ पवार हे एकेकाळी अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी – चिंचवडकडे लक्ष देताना दिसत आहेत. याआधी ही अनेकदा पार्थ पवार यांनी शहरात लक्ष घातलं होत. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भेटी- गाठी घेतल्या होत्या.
आता पुन्हा एकदा पार्थ पवार हे ऍक्टिव्ह झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील महानगर पालिकेला भेट दिली होती. ऐकून अजित पवार यांना पुन्हा एकदा पिंपरी – चिंचवडच्या सत्ता त्यांच्या हाती हवी आहे. असं चित्र दिसत आहे. पण, त्यासाठी त्यांना एकला चलो ची भूमिका घ्यावी लागेल अस बोललं जातं आहे