पंजाबमधील जालंधर येथील श्री बाबा हरिवल्लभ संगीत संमेलनात आयोजित करण्यात आलेल्या तालवाद्य स्पर्धेत पुण्याच्या युवा पखवाजवादक पार्थ भूमकर याने प्रथम क्रमांकासह विजेतेपद पटकाविले.जालंधरमध्ये झालेल्या या संगीत संमेलनात देशभरातील युवा वादक आणि गायक सहभागी होतात. संगीत संमेलनाचे १४७ वे वर्ष असून सुवर्णपदक, प्रशस्तिपत्रक आणि स्मृतिचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.तबला वादक डॉ. महेंद्र प्रसाद शर्मा यांनी तालवाद्याच्या स्पर्धेचे परीक्षण केले.

हेही वाचा >>>पुणे: कृषिमंत्र्यांनी राजकीय स्वार्थासाठी आयोजित केलेला सिल्लोड महोत्सव रद्द करा; स्वतंत्र भारत पार्टीची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रामध्ये पखवाज विषय घेऊन पदवी शिक्षण पखवाज विषय घेऊन पार्थचे शिक्षण सुरू आहे. आजोबा तुकाराम भूमकर आणि वडील अमित भूमकर यांच्याकडून वयाच्या अडीच वर्षांपासून त्याने पखवाज वादनाचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. गेली तीन वर्षे तो तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्याकडे शिक्षण घेत आहे. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या २०१२ मध्ये झालेल्या ‘ताल-निनाद’मध्ये बाल पखवाज वादक म्हणून सहभाग घेतलेल्या पार्थ याचे नाव गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे. मुंबईच्या भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने त्याने मृदंगविशारद ही पदवी संपादन केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.