पुणे : कात्रज भागात सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांकडील मोबाइल चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पकडले. चोरट्याबरोबर असलेल्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले. चोरट्यांकडून सात मोबाइल संच जप्त करण्यात आले. अझर आलम अन्सारी (वय २१, रा. कात्रज) असे अटक करण्ल्त आलेल्या चाेरट्याचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.

चोरट्यांकडून भारती विद्यापीठ आणि कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेले मोबाइल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून, सात मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत. चोरट्यांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. याबाबत एका पत्रकारने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

हेही वाचा – सावध ऐका पुढल्या हाका…

तक्रारदार २८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास कात्रज तलाव परिसरात नेहमीप्रमाणे फिरायला गेले होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील मोबाइल संच हिसकावून नेला. याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. तपास पथकातील पोलीस कर्मचारी मितेश चोरमेले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांनी तांत्रिक तपास केला. तपासात अन्सारीचे नाव निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद झिणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक समीर कदम, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, चोरमले, अवधूत जमदाडे, आदी पोलिसांनी ही कारवाई केली.

हेही वाचा – पुणे : वाघोलीतील कंपनीच्या गोदामातून २४४ लॅपटॉप चोरणारे गजाआड, २४४ लॅपटाॅप, दोन टेम्पो जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात गेल्या काही महिन्यांपासून पादचाऱ्यांकडील मोबाइल संच चोरून नेण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांकडील मोबाइल संच हिसकावून चोरटे पसार होतात. पुणे स्टेशन परिसरात बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांकडील मोबाइल संच चोरुन नेण्याच्या घटना घडतात.