पिंपरी चिंचवड : उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मल्हार मकरंद जोशी अस आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. अद्याप आत्महत्येच कारण समजू शकलं नाही. शेवट चा कॉल हा त्याच्या आई ला मल्हार ने केला होता. त्यांनतर त्याने अस टोकाचं पाऊल उचलले आहे.

पिंपरी- चिंचवड शहरातील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर मध्ये रोझ लँड सोसायटीच्या एक्स विंगच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन अवघ्या १४ वर्षाच्या मल्हार मकरंद जोशी या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा..लोणीकाळभोरमध्ये सापडला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’; दहावी पास तोतया डॉक्टराला पकडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी अवघ्या चौदाव्या वर्षी मल्हार ने आयुष्य संपवण्याचा निर्णय का? घेतला याबाबत चर्चा सुरू झाली आहे. इयत्ता नववी मध्ये शिकत असलेला मल्हार आणि त्याचा भाऊ हे दोघेच घरी होते. तर आई- वडील हे बीड जिल्ह्यातील परळी येथे बाहेरगावी गेले होते. आज दुपारी बाराच्या सुमारास मल्हार आई ला फोन लावण्यासाठी आई च्या मैत्रिणीकडे गेला होता. आई शी फोनवरून बोलणं देखील झालं. त्याच वेळेत मल्हार ने उडी घेऊन आत्महत्या केली आहे. नेमकं मल्हार च त्याच्या आई शी काय बोलणं झालं?. याचा तपास सांगवी पोलीस घेत आहेत.