पिंपरी- चिंचवड: पिंपरी- चिंचवडच्या चिखलीमध्ये एकाची हत्या करण्यात आली आहे. महेश चामे असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चिखली मधील कृष्णा चौकात हत्या झाल्याच समोर आल आहे. अज्ञात कारणावरून ही हत्या करण्यात आल्याच पोलिसांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश चामे हे रस्त्याच्या कडेला मोबाईल स्क्रीन गार्ड लावण्याचा व्यवसाय करतात. ते मूळ लातूर येथील असून सध्या चिखली मधील नवचैतन्य सोसायटीमध्ये राहत होते. आज सकाळी चिखली पोलिसांना कृष्णा नगर चौक ते चेरी चौक या मुख्य रस्त्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पडलेला आहे. अशी माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.
मृत अवस्थेत पडलेले महेश यांच्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार केलेले आहेत. चिखली पोलिसांनी या घटने प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू केलं आहे. अद्याप महेश चामे यांची हत्या कुठल्या कारणावरून करण्यात आली हे अस्पष्ट आहे. घटनेचा अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.