पिंपरी-चिंचवड शहरातील कुदळवाडी- चिखली या भागातील अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेड, भंगार दुकानांवर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. भंगार दुकानांमध्ये वारंवार लागणाऱ्या आगींच्या घटना आणि बांगलादेशी, रोहिंग्यांच्या बेकायदा वास्तव्याबाबत भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारचे लक्ष वेधले आणि दोनच दिवसांत ‘बुलडोझर’ कारवाई सुरू झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र.०२ मधील मोरे- पाटील चौक ते कुदळवाडी पोलीस चौकी येथे १८ मीटर रुंद डी.पी. रस्ता (३०० मीटर लांबी) व कुदळवाडी पोलीस चौकी ते विसावा चौक या ३० मीटर रुंद डी.पी. रस्ता ५५० मीटर लाबींच्या डी.पी.रस्ता रस्त्याच्या दुतर्फा सुमारे ९ हजार चौ.मी. क्षेत्रातील ३० आर.सी.सी. बांधकामे, तसेच सुमारे ४ हजार चौ.मी. क्षेत्रामधील ४५ वीट बांधकामांसह पत्राशेड इत्यादीवर अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले आहे.

हेही वाचा – ‘घटेंगे तो कटेंगे’ हेही लक्षात घेतले पाहिजे, गोविंददेव गिरी यांचे पुण्यात विधान

तसेच, गेल्या दोन दिवसांमध्ये चिखली-कुदळवाडी परिसरातील एकूण १३ हजार चौ.मी. आर.सी.सी. बांधकामे व पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. यामध्ये बहुतांशी भंगार व्यावसायिकांची अनधिकृत दुकाने होती. मंजूर विकास आराखड्यातील रस्ते विकसित करणेकामी कारवाई या पुढेही सुरु राहील, असा इशाराही महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड: रूममध्ये डोकावून का पाहात आहात? जाब विचारला म्हणून महिलेवर स्क्रू ड्रायव्हरने केला हल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे सोसायटीधारक, स्थानिक नागरिक यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. यासह बेकायदेशीरपणे भंगार जाळून रसायनमिश्रीत पाणी इंद्रायणी नदी पात्रात सोडल्यामुळे नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासह आगीच्या घटना, बेकायदेशीर भंगार साठवणूक यामुळे या भागात असुरक्षितता, अस्वच्छता आणि पर्यावरणाची हानी होत आहे. विशेष म्हणजे, बांगलादेशमधून बनावट कागदपत्रांच्या आधारे पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्य करणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या बहुतेककरुन भंगार, रद्दी दुकानांमध्ये काम करत आहेत. ही बाब पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईमध्ये समोर आली आहे. त्यामुळे या कारवाईचे स्थानिक नागरिकांमधून स्वागत होत आहे.