पिंपरी चिंचवड : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींच्या विचारधारेचा पिंपरी- चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून कडेलोट करण्यात आला आहे. शहरातील चिखली परिसरात असणाऱ्या ऐतिहासिक जाधव गडावरून प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट करत विचारधारेचा विरोध करण्यात आला आहे. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केली.

हेही वाचा >>> “तोंड आवरा, पुन्हा आरामाची वेळ येऊ नये” देसाईंच्या इशाऱ्यानंतर राऊतांचे सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले, “महाराष्ट्राची बाजू लढणारे…”

यामुळे अवघ्या राज्यात विरोधक आक्रमक झाले होते तसेच शिवप्रेमी देखील दुखावले गेले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतर महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या व्यक्तीच्या विचारधारेचा विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. त्या विचार धारेचा  प्रतिकात्मक पुतळ्याद्वारे चिखलीतील जाधव गडावरून कडेलोट करण्यात आला आहे. या राज्यपालांचे करायचं काय? खाली डोकं वर पाय? अशा घोषणा देत कडेलोट करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.