पिंपरी : पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या २८० बसची तपासणी केली. त्यापैकी १७१ बसचालकांनी मोटार वाहन कायद्यातील नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. या बसचालकांवर ‘आरटीओ’कडून कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १७ लाख ४७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात २९५७ स्कूल बसची नोंदणी आहे. बसव्यतिरिक्त रिक्षांमधूनही शालेय विद्यार्थांची वाहतूक केली जाते. पुण्यात शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या बस चालकाकडून दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेनंतर प्रादेशिक परिवहन विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेमध्ये एकूण २८० विद्यार्थी प्रवासी बसची तपासणी केली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा : पिंपरी : जगताप कुटुंबातील गृहकलह संपुष्टात? आमदार अश्विनी जगताप यांनी घेतली ‘ही’ भूमिका

यात बसचालकांकडून विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करणे, योग्यता प्रमाणपत्र नसणे, वाहनामध्ये बेकायदेशीर फेरबदल करणे, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणे, कर न भरणे अशा विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७१ वाहनांवर आरटीओच्या सात वायुवेग पथकांमार्फत कारवाई करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव म्हणाले, की आरटीओकडून शहरातील विविध भागांत विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. १७१ बस चालकांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Story img Loader