नाशिक येथे नुकतेच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस हवालदार शरीफ बबन मुलाणी यांनी शरीर सौष्ठव स्पर्धेत सुवर्ण पदक पटकवून आयुक्तालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. यामुळे मुलाणी यांचे आयुक्तालयात कौतुक होत आहे. पोलीस क्रीडा स्पर्धेत अवघ्या महाराष्ट्रातून पोलीस स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत तब्बल दोन हजार ४४४ पुरुष आणि ८८८ महिला पोलिसांनी सहभाग नोंदवला होता. पोलीस हवालदार शरीफ मुलाणी यांना व्यायामाची आवड आहे. पिळदार शरीर बनवण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली. पोलीस असूनही वेळेत जेवण आणि व्यायाम करून त्यांनी आवड जोपासली आहे. हेही वाचा - ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात मंगल स्वरांच्या नामघोषात गणेशजन्म सोहळा हेही वाचा - मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ उद्या पिंपरी-चिंचवड बंदची हाक नाशिक येथे पार पडलेल्या पोलीस क्रीडा स्पर्धेत त्यांनी ९५ ते १०० किलो वजन गटात सुवर्ण पदकाची कमाई केली. २०२३ मध्ये पुणे येथे झालेल्या ३३ व्या क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक मिळवले होते. तर ऑल इंडिया नॅशनल गेममध्येही चमकदार कामगिरी करत ब्रास पदकाची कमाई केली होती.