पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये एका श्वान मादीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ जुलै रोजी वाकड येथील एका निर्माणाधिन बांधकाम प्रकल्पावर ही घटना घडली.

याप्रकरणी सुरक्षा रक्षक लवलेश रामप्रसाद तिवारी (वय २९, रा. वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चिरंजीत निशिकांत बिस्वास (वय ३०, रा. उत्तर दिनाजपूर, पश्चिम बंगाल) याच्याविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – RTE Admissions: प्रवेशासाठी निवड यादी जाहीर…किती विद्यार्थ्यांना प्रवेश?

हेही वाचा – भाजप कार्यकारिणीच्या बैठकीसाठी एक हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त, बालेवाडीत आज बैठक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिरंजीत याने बांधकाम प्रकल्पावर आठ ते दहा महिने वयाच्या श्वान मादी पिल्लाला आणले. इमारतीच्या तळमजल्यावर नेले. तिचा छळ केला. तिच्याशी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात तपास करीत आहेत.