पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविषयी अर्वाच्य भाषेत घोषणाबाजी केल्याप्रकरणी भारतमुक्ती मोर्चाच्या अध्यक्षासह १५० जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा >>> मेधा कुलकर्णींची नाराजी दूर; नितीन गडकरी, फडणवीसांकडून भेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी भारतमुक्ती मोर्चाचे अध्यक्ष सचिन बनसोडे, रोहित मल्लाप्पा उर्फ मल्लू शिंगे यांच्यासह १५० जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे कसबा विधानसभेचे अध्यक्ष अमित कंक यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भारतमुक्ती मोर्चाकडून शिवाजी रस्त्यावरुन फेरी काढण्यात आली होती. फेरीत सहभागी झालेले बनसोडे, शिंगे यांच्यासह १०० ते १५० कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी, तसेच सरसंघचालक भागवत यांच्याविषयी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. ध्वनिवर्धकावरुन फेरीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंक यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करत आहेत.