लोणावळा: लोणावळ्यातील लायन्स पाॅइंट परिसरात बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून हुक्कापात्र, सुगंधी तंबाखू असे साहित्य जप्त केले. लायन्स पाॅइंट परिसरात रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणाऱ्या सहा जणांविरुद्ध पोलिसांनी खटला दाखल केला, तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या तीन पर्यटकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

राज्य शाससाने हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. बेकायदा हुक्का पार्लर चालविणारे संतोष शंकर आखाडे (वय २७, रा. रामनगर, भुशी, लोणावळा), दीपक भागू हिरवे (वय २७, रा. देवघर, ता. मुळशी ) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई रईस मुलाणी यांनी फिर्याद दिली आहे. आखाडे, हिरवे यांच्याकडून सात हुक्का पात्र, फिल्टर, सुुगंधी तंबाखू असा १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी दिली.

हेही वाचा… पुण्यातील उच्चभ्रू भागाचा संकेतस्थळावर शोध घेऊन घरफोड्या… हैदराबादमधील चोरटा असा सापडला जाळ्यात!

लायन्स पाॅइंट परिसरात रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणे, तसेच हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या परिसरातील दुकाने सायंकाळपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. लोणावळा शहर पोलिसांचे पथक रात्री लायन्स पाॅइंट परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी आखाडे आणि हिरवे बेकायदा हुक्का पार्लर चालवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा… पिंपरी: बालगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचे महत्वाचे पाऊल; विद्यार्थ्यांसाठी ‘हा’ उपक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणाऱ्या सहा दुकानदारांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले, तसेच तीन हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक निरीक्षक सचिन राऊळ, उपनिरीक्षक भारत भोसले, हवालदार सागर बनसोडे, अंकुश नायकुडे, नितेश कवडे, सचिन गायकवाड, दत्ता शिंदे, सुभाष शिंदे यांनी ही कारवाई केली.