लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ज्येष्ठ नागरिकाला मधुमोहजालात अडकावून त्याच्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ उभे याला पोलीस दलातून बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

ऊभे याला कायद्याचे ज्ञान असताना त्याने केलेले कृत्य समाजविघातक, बेजबाबदार, तसेच पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणार असल्याचा ठपका ठेऊन पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. कोथरुड भागातील एका ज्येष्ठाला महिलेने मधुमोहजालात अडकावले. त्याच्याशी ओळख वाढवून लक्ष्मी रस्त्यावरील एका हॉटेलवर नेले. त्यानंतर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली.

आणखी वाचा-पुणे : पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडाला नदीपात्रात पकडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस उपनिरीक्षक उभे आणि तीन महिलांनी ज्येष्ठाला हॉटेलमध्ये मारहाण केली. याप्रकरणी उभे याच्यासह तीन महिलांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात ३० जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर उभेला पोलीस दलातून निलंबित करण्यात आले. याप्रकरणात उभेची चौकशी करण्यात आली. चौकशीत उभे दोषी आढळल्याने त्याला पोलीस दलातून बडतर्फ करणयाचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.