पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तिघांवर ३०७ सह इतर कलमानुसार गुन्हा दाखल होता. यामधील ३०७ म्हणजे खुनाचा प्रयत्न हे कलम कमी करण्यात आले आहे अशी माहिती पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिली आहे. शनिवारी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली होती. यात तिघांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आलं होतं. या प्रकरणातराजकीय दबावापोटी पोलिसांकडून आरोपींवर खुनाचा प्रयत्न – ३०७ हे कलम लावण्यात आलं असा आरोप आरोपीचे वकील सचिन भोसले यांनी केला होता. तसंच ३०७ कलम लावल्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर विशेषतः भाजपावर सडकून टीका केली होती.

हेही वाचा… शाईफेक करणाऱ्यांची सांगलीत हत्तीवरुन मिरवणूक काढणार

हेही वाचा… ठाकरे गटाचे आणखी एक नेते अडचणीत; आमदार राजन साळवींची उद्या ‘एसीबी’कडून चौकशी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर राज्यभरातून विविध संघटना, राजकीय पक्षांनी आंदोलने केली. दरम्यान शनिवारी पिंपरी -चिंडवड दौऱ्यावर असतांना चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करण्यात आली. यानंतर तिघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. उद्या त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यांच्यावरील ३०७ कलम हे हटवल्याने आता त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे.