पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीतील सरकारमधील एका मंत्र्यांचं नाव या प्रकरणात चर्चेत आल्यानंतर सगळ्याचं कान घटनेच्या घडामोडींकडे लागल्याचं दिसत आहे. राजकीय वर्तुळात हा विषय ज्वलंत बनत असल्याचं चित्र असून, भाजपाकडून कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्यातच आता पूजा चव्हाणचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला असून, तिचा मृत्यू कशामुळे झाला? याच कारण समोर आलं आहे.

पूजा चव्हाणच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टबद्दल पुणे पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली. वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांना राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी बोलवून घेतलं होतं. दीपक लगड यांच्याकडून हेमंत नगराळे यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली.

आणखी वाचा- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना मंत्री; भाजपाने पहिल्यांदाच घेतलं नाव

पूजा चव्हाण या तरुणीचा मृत्यू डोक्याला मार लागून झाल्याचा पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उल्लेख असल्याचं दीपक लगड यांनी हेमंत नगराळे यांना सांगितलं आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. पूजा चव्हाणने ७ फेब्रुवारीला पुण्यात आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत राहत होती. मात्र ७ फेब्रुवारीला तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली.

आणखी वाचा- “पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी व्हायरल ऑडिओ क्लिप्सची सखोल चौकशी करा!”

नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मूळची बीड जिल्ह्यातील असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुण्यात आत्महत्या केली होती. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका मंत्र्याचं नाव या प्रकरणात समोर आलं आहे. भाजपाकडून या मंत्र्यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला असून, राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आलेली आहे. या प्रकरणाच्या ११ ऑडिओ क्लिप्सही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आहेत.