राज्यभरात आमच्या संघटनेच्या २० नेत्यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या आदेशानेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आमच्यावर ही कारवाई केली आहे. आमचा विनाकारण छळ सुरू आहे. आमच्या नेत्यांना चार-पाच वर्षे तुरुंगात टाकून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करीत आहेत. आम्हाला या देशाचे नागरिक म्हणून सन्मानाची वागणूक मिळत नाही, अशी टीका पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (पीएफआय) पुणे जिल्हाध्यक्ष मोहम्मद खैस शेख यांनी केली आहे. या वेळी कुल जमाती तंजीमचे समन्वयक इलियास मोमीन आणि सावित्री फातिमा विचार मंचचे अली इनामदार यांनी आपले मत मांडले.

शेख म्हणाले, की पुण्यातील दोघांसह राज्यातून एकूण २० जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. कोणतेही चुकीचे कृत्य केले नसताना आमच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष्य केले जाते. त्यांना चार-पाच वर्षे तुरुंगात टाकून आयुष्य उद्ध्वस्त केले जाते. आमच्या संघटनेची स्थापना २००७ मध्ये झाली. २०१४ पर्यंत आमच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. २०१४ला भाजपची सत्ता आल्यापासून विनाकारण लक्ष्य केले जात आहे. करोना काळात आमच्यावर परदेशांतील देणग्यांवरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला. आमची सर्व कागदपत्रे तयार होती, त्यामुळे ईडीला पुढे कारवाई करता आली नाही. आता एनआयए आमच्या संघटनेच्या कार्यालयांवर धाडी टाकत आहे. आम्ही याचा निषेध करतो. आम्हाला दहशतवाद्यांसारखी वागणूक मिळत आहे. आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आम्हाला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’

कोंडव्यात पीएफआयचे कार्यालय नाही
कोंढव्यात ज्या ठिकाणी एनआयएने छापा टाकला, ते पीएफआयचे कार्यालय नाही. संस्थेकडून कार्यक्रमावेळी ठराविक वेळेसाठी हॉल भाड्याने घेतला जातो. त्या हॉल मालकालाही एनआयएने दमदाटी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी केसरबाग परिसरात कार्यालय सुरू केले आहे, असेही शेख म्हणाले.