पिंपरी : महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट)च्या आदेशानुसार प्रतिनियुक्तीच्या पदाकरितेची पात्रता तपासून प्रदीप जांभळे-पाटील यांची पुन्हा महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीने उपायुक्त असलेल्या स्मिता झगडे यांची १३ सप्टेंबर २०२२ रोजी राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली होती. महापालिका आयुक्तांनी दहा दिवस त्यांना रूजू करून घेतले नव्हते. त्यानंतर राज्य शासनाने २२ सप्टेंबर २०२२ रोजी झगडे यांची नियुक्ती रद्द करुन प्रदीप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. पण, झगडे यांनी जांभळे यांच्या नियुक्तीला महाराष्ट्र प्रशासकीय लवादमध्ये (मॅट) आव्हान दिले होते.

हेही वाचा : पिंपरी : भाजपाने अजित पवारांना पालकमंत्रीपद दिले, पण अधिकारही…; शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांचा खोचक टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदावरील नियुक्ती २२ सप्टेंबर २०२३ पर्यंतच राहील. त्यादिवसापासून जांभळे यांची दोन वर्षांची नियुक्ती संपुष्टात येईल. जांभळे यांची पुन्हा पात्रता तपासण्याचे निर्देश ‘मॅट’ने शासनाला दिले होते. त्यानुसार प्रतिनियुक्तीच्या पदाकरिताची पात्रता पुन्हा तपासण्यात आली. जांभळे यांची महापालिका अतिरिक्त आयुक्त पदावरील प्रतिनियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मॅट, मुंबई उच्च न्यायालय असा सुरू असलेला वर्षभराचा प्रवास आणि अतिरिक्त आयुक्त पदाच्या वादावर अखेर पडदा पडला आहे.