पुणे : पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले ‘डीआरडीओ’चे संचालक डाॅ. प्रदीप कुरुलकर यांना २९ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी दिले. डॉ. कुरुलकर यांच्या एटीएस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसर कुरुलकर यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

कुरलकर यांना न्यायालयीन कोठडीत औषधे उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र. त्यांना घरचे जेवण देण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. कुरुलकर यांना पाकिस्तानातून काही ई-मेल पाठविण्यात आले आहेत. कुरुलकर यांनी देशाच्या सुरक्षेला बाधा आणणारी काही छायाचित्रे पाठविल्याचा संशय आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटाॅप आणि मोबाइल संचाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असून, याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला आहे.