scorecardresearch

Premium

फोर्स मोटर्स प्रकरणी दोन दिवसांत निर्णय न झाल्यास आपणही उपोषणाला बसू – प्रकाश मेहता

शहरातील कंपन्या बाहेर जात असतील तर जाऊ द्या. काँग्रेसच्या कलंकित सरकारमुळे ही वेळ आली. असे कामगारमंत्री प्रकाश मेहता यांनी म्हटले आहे.

फोर्स मोटर्स प्रकरणी दोन दिवसांत निर्णय न झाल्यास आपणही उपोषणाला बसू – प्रकाश मेहता

आकुर्डीतील फोर्स मोटर्स कामगारांच्या कुटुंबीयांना महिला दिनापासून सुरू केलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी राज्याचे कामगारमंत्री प्रकाश मेहता यांनी गुरुवारी भेट दिली. कामगारांच्या पाठिशी असल्याचा दिलासा देत उद्योजकांच्या मुजोरपणामुळे कामगारांचे नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. दोन दिवसांत निर्णय न झाल्यास आपणही उपोषणाला बसू, असेही त्यांनी नमूद केले.
कामगारांना ११ वर्षांपासून वेतनवाढ मिळत नसल्याच्या निषेधार्थ काही महिला उपोषणास बसल्या आहेत. या प्रश्नात सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी वैशाली पाटील, वैशाली जगताप, सुरेखा बोज्जा, अपर्णा वरूडकर या आंदोलक महिलांनी नुकतीच पत्रकार परिषदेत केली. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी आंदोलकांना पािठबा दिला. शिवसेनेकडून निर्णायक पाठपुरावा सुरू असतानाच आमदार महेश लांडगे यांनी पालकमंत्री गिरीश बापट व मेहता यांच्याकडे दाद मागितली. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, कामगारमंत्र्यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर, पत्रकारांशी संवादही साधला.
ते म्हणाले, कामगारांची कुचंबणा करून उद्योग वाढवण्याचा सरकारचा मानस नाही. उद्योगपतींनी स्वत:ची प्रगती जरूर करावी, कामगारांचे हक्क डावलू नयेत. महाराष्ट्रात उद्योगाला वाव आहे. कामगार-उद्योगपतींमध्ये समन्वय हवा. कामगारांची जबाबदारी सरकारने घेतली आहे, त्यासाठीच येथे आलो आहे, असे ते म्हणाले.  अमर साबळे, आमदार लांडगे, भाजपचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे, एकनाथ पवार, राजु दुर्गे आदी उपस्थित होते.

‘काँग्रेसच्या कलंकित सरकारमुळे कंपन्यांचे स्थलांतर’
औद्योगिक भूखंडांच्या निवासीकरणाचा (आय टू आर) निर्णय झाला. त्यानंतर गुंतवणूक झाली व मोठय़ा प्रमाणात बांधकामेही झाली. आता त्या लोकांचे नुकसान करता येणार नाही. शहरातील कंपन्या बाहेर जात असतील तर जाऊ द्या. काँग्रेसच्या कलंकित सरकारमुळे ही वेळ आली. आम्ही तसे होऊ देणार नाही, असे कामगारमंत्री प्रकाश मेहता यांनी म्हटले आहे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
hunger strike, Rohit Patil, Health deteriorated, sangli
उपोषण सुरु करताच रोहित पाटलांची प्रकृती खालावली

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prakash mehta supported force motors labours family

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×