पुणे : आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रानभाजी वाघाटीचा भाव यंदा वधारला आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने वाघाटीला उच्चांकी भाव मिळाला आहे. आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी दुसऱ्या दिवशी वाघाटीची भाजी केली जाते. जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातून, तसेच धाराशिव परिसरातील शेतकऱ्यांनी वाघाटी बाजारात विक्रीस पाठविली जाते. महात्मा फुले मंडईत एकूण मिळून १०० किलो वाघाटीची आवक झाली, अशी माहिती महात्मा फुले मंडईतील भाजीपाला व्यापारी रवींद्र खांदवे यांनी दिली.

वाघाटीची भाजी खाऊन उपवास सोडण्याची प्रथा ग्रामीण भागात आजही आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला ग्रामीण भागातील शेतकरी वाघाटी महात्मा फुले मंडईत विक्रीस पाठवितात. वाघाटी ठरावीक भाजीपाला विक्रेत्यांकडे मिळते. पुरंदर, तसेच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा वाघाटी विक्रीस पाठविली असून, गुरुवारी (१८ जुलै) वाघाटीला मागणी वाढणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा…अजित गव्हाणे यांच्या शरद पवार गटात पक्ष प्रवेश, अजित पवार यांची पिंपरी चिंचवड येथील पदाधिकाऱ्यांसोबत पुण्यात बैठक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाघाटीची भाजी नैसर्गिकरीत्या येते. सह्याद्रीच्या डोंगररांगांत वाघाटीची काटेरी झाडे असतात. शेतकरी काटेरी जाळीत असलेली वाघाटीची फळे तोडतात. वाघाटी आणि करटूल या दोन भाज्यांमध्ये फरक आहे. वाघाटाची फळे बेलफळाप्रमाणे असतात. आकाराने वाघाटीची फळे मध्यम असतात. करटूल काटेरी असते.– रवींद्र खांदवे, भाजीपाला व्यापारी, महात्मा फुले मंडई