पुणे : रमजान ईदमुळे मासळी आणि चिकनचे दर वाढले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मासळीचे दर दहा टक्क्यांनी, तर चिकनच्या दरात प्रतिकिलो वीस रुपयांनी वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

इंग्लिश अंड्यांच्या दरात शेकड्यामागे १५ रुपयांनी वाढ झाली आहे. मटण, गावरान अंड्यांचे दर स्थिर आहेत. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी १० ते १२ टन, खाडीतील मासळी २०० ते ४०० किलो, नदीतील मासळी ५०० ते ७०० किलो तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची मिळून १५ ते २० टन आवक झाली.

हेही वाचा – पुणे : भाकरी न मिळाल्याने मद्यधुंद महिलेचा उपहारगृहात गोंधळ; महिला पोलिसाला धक्काबुक्की

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गणेश पेठेतील मासळी बाजारात मासळीची आवक कमी झाली आहे. मागणी चांगली असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत मासळीच्या दरात दहा टक्यांनी वाढ झाली झाली. रमजान ईदमुळे चिकनला मागणी वाढल्याने प्रतिकिलोमागे २० रुपयांनी वाढ झाली.