पुणे : पालकांनी आपल्या मुलांना गोष्ट सांगण्याबाबत पुण्यात नोंदवल्या गेलेल्या विश्वविक्रमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली. वाचनाचा आनंद पोहोचवण्यासाठीचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत पुणे महापालिकेने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर ‘पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्ट सांगणे’ हा उपक्रम गुरुवारी आयोजित केला होता. त्यात उपक्रमात क्षिप्रा शहाणे यांनी लिहिलेल्या ‘निसर्गाचा नाश करू नका’ ही गोष्ट पालकांनी आपल्या मुलांना सलग तीन मिनिटे वाचून दाखवली.

हेही वाचा : पुणे : मध्यवर्ती शासकीय इमारतीसमोर कर्मचाऱ्यांची निदर्शने

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३ हजार ६६ पालकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. त्यानंतर ‘गिनेस बुक’च्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून विश्वविक्रमांची नोंद झाल्याचे जाहीर करताच घोषणा देऊन आनंद साजरा करण्यात आला. चीनमध्ये आठ वर्षांपूर्वी दोन हजार ४७९ पालकांनी एकाचवेळी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगून विश्वविक्रम नोंदवला होता. मात्र पुण्यात नोंदवल्या गेलेल्या नव्या विश्वविक्रमामुळे चीनचा विक्रम मोडीत निघाला आहे.