राज्यातील विविध कारागृहांतील कैद्यांना अंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून कारागृह विभागाचे अतिरिक्त पाेलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी याबाबतचे आदेश दिले आहे.

हेही वाचा >>> पिंपरी- चिंचवडमध्ये राष्ट्रवादीत दुफळी? जगताप कुटुंबीयांना उमेदवारी दिल्यास बिनविरोध निवडणूक करण्याची पक्षातील आमदाराची भूमिका

राज्यातील विविध कारागृहातील कच्चे कैदी (न्यायाधीन बंदी) तसेच शिक्षा झालेल्या कैद्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यात येत आहे. राज्य कारागृह विभागाकडून राज्यातील सर्व कारागृहांतील उपमहानिरीक्षक आणि मध्यवर्ती कारागृहांचे अधीक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत कारागृह प्रशासनाकडून कैद्यांना गरम पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. हिवाळा आणि पावसाळ्यात कैद्यांना गरम पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी बैठकीत दिले.

हेही वाचा >>> ‘डाव्होसमध्ये सामंजस्य करार झालेल्या कंपन्या महाराष्ट्रातील आहेत का?’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “विरोधकांना… ”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारागृहातून कैद्यांना नातेवाइकांशी संवाद साधण्यासाठी दूरध्वनी सेवा उपलब्ध करून देण्यात येते. नातेवाइकांशी संवाद साधण्यासाठी कारागृहात दूरध्वनी सुविधा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. थंडीत चादर, सतरंजी, उशी उपलब्ध करून देण्याची मागणी कैद्यांकडून करण्यात आली आहे. कैद्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना गुप्ता यांनी दिल्या आहेत. राज्यातील विविध कारागृहांत कैद्यांकडून विविध प्रकारच्या वस्तू तयार करण्यात येतात. मागणी नोंदविणाऱ्या कैद्यांना आवश्यक त्या वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.