पुणे : Maharashtra Common Entrance Test (MHT CET) 2023 Exam Dates: आगामी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांतील सामायिक प्रवेश परीक्षांचे (सीईटी) संभाव्य वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) प्रसिद्ध केले. त्यानुसार अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठीची एमएचटी-सीईटी ९ ते २० मे दरम्यान होणार असून, एमबीए सीईटी १८ आणि १९ मार्चला, तर एमसीए सीईटी २५ आणि २६ मार्चला होईल.

सीईटी सेलने आगामी शैक्षणिक वर्षांत विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करण्याबाबत पुरेशी कल्पना मिळणार आहे. या वेळापत्रकानुसार हॉटेल मॅनेजमेंट अँड केटिरग टेक्नॉलॉजीच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश होणारी ‘बीएचएमसीटी’ सीईटी २० एप्रिलला, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची एमएचएमसीटी सीईटी ३० एप्रिलला होणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे बी-प्लॅिनग सीईटी २३ एप्रिला होण्याची शक्यता आहे. बी-डिझाइन सीईटी ३० एप्रिलला; तसेच आर्किटेक्चरच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेशासाठीची सीईटीही ३० एप्रिला होण्याची शक्यता आहे. हे वेळपत्रक संभाव्य असल्याने त्यात बदल होण्याची शक्यता असते.

अभ्यासक्रम आणि सीईटी दिनांक
विधी पाच वर्षे अभ्यासक्रम – १ एप्रिल
विघी तीन वर्षे वर्षे – २ आणि ३ मे
बीए बीएड, बीएस्सी बीएड – २ एप्रिल
बीएड-एमएड – २ एप्रिल
बीएड, बीएड इलेक्टिव्ह – २३ ते २५ एप्रिल
शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी – ३ मे
शारीरिक शिक्षणशास्त्र पदव्युत्तर पदवी – २३ एप्रिल
शिक्षणशास्त्र पदव्युत्तर – ९ मे
फाइन आर्टस् सीईटी – १६ एप्रिल