scorecardresearch

राहुल गांधींना ‘त्या’ विधानाप्रकरणी शिक्षा सुनावल्याने पुण्यात काँग्रेसचे आंदोलन; पंतप्रधानांविरोधात जोरदार घोषणाबाजी

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले असून, पंतप्रधान मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Protest Congress Pune
राहुल गांधींना 'त्या' विधानाप्रकरणी शिक्षा सुनावल्याने पुण्यात काँग्रेसचे आंदोलन (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे : काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कर्नाटकच्या कोलार येथे आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून टीका केली होती. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. या विरोधात गुजरातमधील भाजपाचे माजी आमदार तथा माजी मंत्री पुरनेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्या प्रकरणी सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्या निर्णयानंतर देशभरात काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले असून, पंतप्रधान मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा – राज ठाकरे यांच्या विरोधात पिंपरीत तक्रार अर्ज दाखल

हेही वाचा – व्हिडीओ ‘लाइक’ केला अन् संगणक अभियंता तरुणीची झाली २२ लाखांची फसवणूक

यावेळी अरविंद शिंदे म्हणाले की, राहुल गांधी यांनी २०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती, त्यावर आज न्यायालयाने निर्णय दिला असून, राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राजकीय जीवनात एकमेकांवरील टीका टिपणी हसतखेळत स्वीकारली पाहिजे, पण हे भाजपा नेत्यांना मान्य नसल्याचे दिसून येत आहे. आमच्या विरोधात काही विधाने केलीत तर तुम्ही जेलमध्ये जाणार, हेच आजच्या निर्णयामधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध व्यक्त करीत आहोत. त्याचबरोबर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही अधिक ताकदीने रस्त्यावर उतरून सरकारविरोधात लढा उभारणार, असा इशारा त्यांनी दिला.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 14:45 IST

संबंधित बातम्या