scorecardresearch

व्हिडीओ ‘लाइक’ केला अन् संगणक अभियंता तरुणीची झाली २२ लाखांची फसवणूक

एका आयटी कंपनीतील संगणक अभियंता तरुणीची तब्बल २१ लाख ९५ हजार २० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

online fraud
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: पार्ट टाईम नोकरी देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या लिंक पाठवून त्या लाइक करायला सांगून एका आयटी कंपनीतील संगणक अभियंता तरुणीची तब्बल २१ लाख ९५ हजार २० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.२२) सायंकाळी साडेचारच्या सुमारास वाकड येथे घडला.

याप्रकरणी संबंधित अभियंता तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी मोबाइल धारक, आलियाना फ्रॉम ग्लोबल चॅट कंपनीवर माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा- राज ठाकरे यांच्या विरोधात पिंपरीत तक्रार अर्ज दाखल

हिंजवडी ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक गाढवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आयटी कंपनीत संगणक अभियंता आहेत. फिर्यादीला अनोळखी मोबाईल क्रमांक, चॅट कंपनीकडून संपर्क साधण्यात आला. ‘पार्ट जॉब’ देतो असे सांगण्यात आले. युट्युबवर व्हिडीओ लाईक केल्यानंतर पैसे खात्यात जमा होतील असे सांगितले.

फिर्यादीला वेगवेगळ्या लिंक शेअर केल्या. त्या त्यांनी लाईक केल्या. त्यावेळी त्यांच्या खात्यात एक हजार ५०० रुपये जमा झाले. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आणखी काही टास्क आहेत. ते तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यात टास्कप्रमाणे पैसे जमा होतील असे सांगितले. त्यानुसार फिर्यादीने टास्क पूर्ण केल्या. त्यानंतर आरोपींनी आणखी टास्क पूर्ण करावे लागतील. तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील असे खोटे सांगून फिर्यादीची २१ लाख ९५ हजार २० रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 13:38 IST

संबंधित बातम्या