scorecardresearch

पुणे : केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेचे उद्या आंदोलन

आजवरच्या कारवाईच्या निषेधार्थ उद्या आम्ही दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर आंदोलन करणार असल्याचे मोहमद शेख यांनी सांगितले.

पुणे : केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेचे उद्या आंदोलन

पुण्यातील कोंढवा भागातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या मुख्य कार्यालयावर एनआयए, एटीएस,जीएसटी तपास यंत्रणांमार्फत छापा टाकण्यात आला.या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले . या कारवाईत काही साहित्य देखील जप्त करण्यात आले. केंद्रीय तपास पथकाकडून झालेल्या छापेमारीमुळे कोंढवा भागात एकच खळबळ उडाली. या कारवाईच्या निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष मोहमद शेख आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले की, कोंढवा भागात आम्ही जो हॉल कार्यक्रमा करिता घेत होतो. त्या मालकाला केंद्रीय तपास यंत्रणेतील अधिकार्‍यांनी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास धमकावले. त्याच दरम्यान माजी राज्य सरचिटणीस रझी खान आणि अब्दुल कय्युम शेख या दोघांना अधिकार्‍यांना ताब्यात घेतले.अब्दुल कय्युम शेख हे आयटीमध्ये काम करणारे,तर रझी खान हे बांधकाम व्यावसायिक आहेत. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी या दोघांना ताब्यात घेतल्याचे तपास यंत्रणा मार्फत सांगण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : उद्धव ठाकरे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रक्षोभक भाषणं करत आहेत ; गिरीश महाजनांची टिका

तसेच ते पुढे म्हणाले की, केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून केंद्रातील तपास यंत्रणेला हाताला धरून मुस्लिम समाजाला लक्ष करत आहे. आज अखेर जवळपास 20 जणांना ताब्यात घेतले गेले आहे. या अशा कारवाईमुळे संबधित व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबियाचे समाजात जगताना मुश्किल होते. तर एखाद्या ताब्यात घेतल्यावर जवळपास तीन वर्ष ते 10 वर्ष त्याची चौकशी सुरू असते. त्यामध्ये त्याच संपूर्ण आयुष्य उध्वस्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : मागील मुख्यमंत्री अडीच वर्षात मंत्रालयात आले नाही, मुख्यमंत्री शिंदे हे कुठे मौजमजा करण्यास फिरत नाहीत – शंभूराज देसाई

तसेच ते पुढे म्हणाले की,नांदेड येथील यशवंत शिंदे यांनी याचिका दाखल केले की देशभरात 2000 सालापासून झालेल्या बॉम्ब ब्लास्टच्या घटनांमध्ये भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्या याचिकेची दखल घेतली जात नाही.पण आम्ही सर्व समाजासाठी काम करत असताना आमच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तसेच लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांना काही महिने शिल्लक राहिल्या आल्या की,मुस्लिम समाजातील संघटनांवर केंद्रातील भाजप सरकार याच तपास यंत्रणा मार्फत कारवाई करीत आहे.या सर्व आजवरच्या कारवाईच्या निषेधार्थ उद्या आम्ही दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या