पतंग उडवून सणाचा आनंद लुटताना आकाशात विहार करणाऱ्या पक्ष्यांवर ‘संक्रांत’ येणार नाही याची दक्षता घ्यावी, या विषयी ‘पेटा’ कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जनजागृती केली. ‘काच असलेला मांजा नका वापरू, जखमी करू नका पाखरू’ असा फलक घेत युवतींनी नामदार गोखले रस्त्यावरील तरुणाईसह नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

हेही वाचा- पुण्यात १२ वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीचा शोध सुरू

पतंग उडवणाऱ्या धारदार मांजात अडकलेल्या आणि रक्ताने माखलेल्या पक्ष्यांच्या वेशभूषेत ‘पीपल फॉर द एथिकल ट्रिटमेंट ऑफ अनिमल्स’च्या (पेटा) वतीने मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर जागृती करण्यात आली. ‘काच असलेला मांजा नका वापरू, जखमी करू नका पाखरू’ असे लिहिलेली पतंगाच्या आकाराचे फलक पक्ष्यांच्या वेशभूषेतील पूजा राठोड, नजिफा अन्वर आणि राशी अधाना या युवतींनी हाती धरले होते.

हेही वाचा- ‘पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करा,’ अमोल मिटकरींची मागणी; हिंदू महासंघाचा विरोध!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पेटा’च्या राधिका सूर्यवंशी म्हणाल्या, संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवून आनंद साजरा केला जातो. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार मांजामुळे जखमी होऊन असंख्य पक्षी दगावतात. धारदार मांजामुळे माणसांनाही जखम झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. हे टाळण्यासाठी धारदार मांजाऐवजी कापसापासून तयार केलेला मांजा वापरावा, असे आवाहन करण्यात आले.