खडकीतील दारुगोळा कारखान्यात चंदन चोरी ; १३ झाडे कापून चोरटे पसार

चोरट्यांनी बोट क्लब परिसरातील १३ चंदनाची झाडे कापून नेली.

sandalwood tree stolen
(संग्रहित छायाचित्र)

पुणे : खडकीतील दारुगोळा कारखान्याची सुरक्षा व्यवस्था भेदून आवारातील १३ चंदनाची झाडे चोरट्यांनी कापून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत खडकी दारुगोळा कारखान्यातील अधिकारी मोहन मोरे (वय ५८, रा. नारायण पेठ) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खडकी दारूगोळा कारखान्याचे आवार विस्तीर्ण आहे. मध्यरात्री चोरटे दाट झाडीतून दारुगोळा कारखान्यात शिरले. चोरट्यांनी बोट क्लब परिसरातील १३ चंदनाची झाडे कापून नेली. दारुगोळा कारखान्याच्या मागील बाजूस मुळा नदी आहे. नदीपात्रातून चोरटे आवारात शिरल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस कर्मचारी एम. एम. शेख तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune 13 sandalwood trees stolen from ammunition factory in khadki zws

Next Story
पुणे : घराच्या छतावर मोबाईल मनोरा बसविण्याच्या आमिषाने फसवणूक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी