पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला आज दुपारी लागलेल्या भीषण आगीत १८ जणांचा मृत्यू झाला असून, काही कामगार बेपत्ता आहेत. तर, १९ कामगारांना वाचवण्यात यश आलं आहे. या कंपनीत केमिकल बनवण्याचे काम सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे.

आग लागल्याची माहिती समजताच पोलीस व अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळवण्यासीठी प्रयत्न सुरू केले. घटनास्थळी अग्निशामक दलाचे पाच बंब दाखल झाले होते. याशिवाय रूग्णवाहिका देखील दाखल झाली होती. तर, बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यासाठी कंपनीची संरक्षक भिंत जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली.

Pune MIDC Fire : आगीचं क्रौर्य! ‘त्या ’ १८ जणांची ओळखही पटेना
Pune MIDC Fire : पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाखांची मदत जाहीर!
Pune MIDC Fire : मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर!

या कंपनीत केमिकल तयार केले जात होते, या केमिकलमुळे  ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. या आगीमुळे परिसरात मोठ्याप्रमाणावर धूर देखील पसरला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील मुळशीमधील उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या केमिकल कंपनीला आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. त्यावेळी कंपनीत ३७ कामगार होते. आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर कामगारांचा शोध घेतला जात आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.