scorecardresearch

पुणे : विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

विवाहाच्या आमिषाने तिला तळजाई, खेड शिवापूर परिसरात नेले.

पुणे : विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
( संग्रहित छायचित्र )

विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर विवाहास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीने अंगावर रॅाकेल ओतून पेटवून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश मोरे (वय २१, रा. गुलटेकडी ) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात बाल अत्याचार प्रतिबंध कायदा (पोक्सो) तसेच बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोरे याने अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून तिला विवाहाचे आमिष दाखविले होते.

विवाहाच्या आमिषाने तिला तळजाई, खेड शिवापूर परिसरात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर अल्पवयीन मुलीने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने विवाहास नकार दिल्याने मुलीने अंगावर रॅाकेल ओतून पेटवून घेतले. पोलीस उपनिरीक्षक वालकोळी तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या