पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता दररोज २३५ विमानांची ये-जा होणार आहे. यापूर्वी दिवसातून २२० विमानांची ये-जा होत होती. पुणे विमानतळावरून विमान प्रवासाच्या वारंवारितेत वाढ करण्यात यावी, अशी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती.

याबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांना पत्र पाठवले होते. त्याला प्रतिसाद देऊन हवाई दलाकडून आणखी १५ उड्डाणांसाठी मंजुरी देण्यात आली. त्यानुसार पहाटे सहा ते रात्री साडेदहा या वेळेत २३५ विमाने ये-जा करतील.