पुणे: राज्यभरातील वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने अडीच कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे, मात्र अद्याप ते सुरू झालेलं नाही. तरीही प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


या प्रकरणी तिघांवर गुम्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवेशाच्या आमिषाने आत्तापर्यंत १३ जणांची फसवणूक करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी चंद्रशेखर देशमुख, राजेंद्र कुशावह, पारस शर्मा यांच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अहमदनगरमधील एका पालकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पुणे महानगरपालिकेकडून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात आत्तापर्यंत ७८ जणांना प्रवेश देण्यात आले आहेत. आणखी २० जागांवर प्रवेश देण्यात येणार आहेत. आरोपी चंद्रशेखर देशमुख याने विमाननगर परिसरात शिक्षा सेवा इंडिया ही संस्था सुरू केली होती. तक्रारदार यांचा मुलगा जयदीप याला नाशिकमधील एका वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष देशमुख आणि साथीदारांनी दाखवले होते. व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देतो, असे आरोपींनी सांगितलं होते. वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावाने बनावट पत्र तक्रारदाराला दाखवण्यात आले होते. प्रवेशासाठी ३० लाख ७२ हजार रुपये घेण्यात आले होतेय तक्रादाराच्या मुलाला प्रवेश मिळाला नाही. संशय आल्याने त्यांनी चौकशी केली तेव्हा फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune atalbihari vajpeyi medical college pune print news vsk
First published on: 08-04-2022 at 16:42 IST