पुणे : ओैंध रस्त्यावरील एका बंगल्यातून चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा खडकीतील औंध रस्ता परिसरात कैलास कुटीर इमारतीजवळ बंगला आहे. मंगळवारी मध्यरात्री बंगल्याच्या सीमाभिंतीवरून उडी मारून चोरटे आत शिरले. त्यांनी करवतीचा वापर करून चंदनाचे झाड कापून नेले. चंदनाचे झाड कापून नेण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस कर्मचारी चक्रे तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, तसेच सोसायटी, बंगल्याच्या आवारातून चोरट्यांनी चंदनाची झाडे कापून नेली आहेत.