पुणे : कौटुंबिक वादातून पत्नीच्या डोक्यात टिकाव मारून तिचा खून केल्याप्रकरणी एकाला न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनोदकुमार केहरसिंग बंजारा (वय ३५, सध्या रा. कासार अंबोली, मुळशी, मूळ रा. उत्तरप्रदेश) असे शिक्षा सुनावलेल्या पतीचे नाव आहे. विनोदकुमारने १९ फेब्रुवारी २०१७ रोजी कासार अंबोली येथे पत्नी सुनीतादेवी बंजारा (वय २८) हिचा खून केला होता. या प्रकरणी त्याच्या विरोधात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा – पुणे : शरद पवारांसमोर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अंतर्गत गटबाजीचा वाचला पाढा; म्हणाले “गटतट दूर झाल्यास…”

विनोदकुमार आणि त्याची पत्नी सुनीतादेवी वीटभट्टीवर मजुरी करत होते. वीटभट्टीमालक रमेश बंडू कांबळे (वय ६०, रा. कासारअंबोली) यांनी फिर्याद दिली होती. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एन. एस. मोरे आणि पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी या गुन्ह्याचा तपास केला. या खटल्यात सरकार पक्षाकडून सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी बाजू मांडली.

सहायक उपनिरीक्षक बी. बी. कदम, विद्याधर निचित, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली. साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने विनोदकुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विनोदकुमार आणि त्याची पत्नी सुनितादेवी यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. विनोदकुमारने पत्नीच्या डोक्यात टिकाव मारला. गंभीर जखमी झालेल्या सुनीतादेवीचा जागीच मृत्यू झाला. विनोदकुमार खून केल्यानंतर पसार झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune court life imprisonment to husband for wife murder pune print news rbk 25 ssb
First published on: 05-01-2023 at 14:47 IST