पुणे : बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मंगळवार पेठेत पकडले. त्यांच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तूले आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. बॉबी भागवत सुरवसे (वय २८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), वैभव चंद्रकांत कोलते (वय ३२, रा. पिसर्वे, ता. पुरंदर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी मंगळवार पेठेतील कोंबडी पूल परिसरात गस्त घालत होते. सुरवसे पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी मयूर भोकरे आणि अमोल आवाड यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून सुरवसेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले.

हेही वाचा…धक्कादायक ! पुण्यातील सरकारी वकील महिलेने घेतली दहा हजारांची लाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौकशीत त्याने एका पिस्तुलाची विक्री पुरंदर तालुक्यातील कोलते याला केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने कोलतेला ताब्यात घेतले. सुरवसे आणि कोलते यांच्याकडून दोन पिस्तूल आणि चार काडतूसे जप्त करण्यात आली. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, अभिजीत पाटील, मयूर भोकरे, अमोल आवाड, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, सयाजी चव्हाण, प्रफुल्ल चव्हाण, गींतांजली जांभुळकर यांनी ही कारवाई केली.