पुणे : विवाहितेला गुंगीचे इंजेक्शन देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत पीडित विवाहितेने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, मुसफ मुनीर खान (वय ३८, रा. रास्ता पेठ,) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुसफ खान हा पीडितेच्या ओळखीचा आहे. जानेवारी महिन्यात तो तरुणीला भेटला. तुझ्या आई-वडिलांचे भांडण झाले आहे, असे सांगून त्याने विवाहितेला रिक्षातून अज्ञात ठिकाणी नेले. तिला इंजेक्शन दिले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. चित्रफीत तयार केली. या प्रकाराची कोणाला वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्याने चित्रफीत पतीला पाठविण्याचीही धमकी दिली. आरोपी खान याच्या धमकीमुळे घाबरलेल्या विवाहितेने नुकतीच लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक भराड तपास करीत आहेत.