पुणे : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून तरूणाला बेदम मारहाण करीत त्यांच्यावर वार करणाऱ्या दोघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ९ सप्टेंबरला पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानक परिसरात घडली होती. महेश अंबादासजी फोटजावरे (वय १९) आणि प्रसाद दत्तु कांबळे (वय २७, दोघेही फिरस्ते, रा. पुणे स्टेशन,) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ९ सप्टेंबर रोजी पहाटेसाडे वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावरील फलाटावर थांबले होते. त्यावेळी तिघांजणांनी त्यांना दारु पिण्यासाठी पैसे मागतिले. तक्रारदाराने त्यांना नकार दिल्याच्या रागातून आरोपींनी तरुणाला शिवीगाळ आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्या पोटावर आणि हातावर वार जखमी केले. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तरुणाने जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.

यासंदर्भात पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी तपास पथकाला मार्गदर्शन करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना दोघा आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार १६ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास पथकाने फोटजावरे आणि कांबळेला ताब्यात घेतले. आरोपींना पुणे रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

अपर आयुक्त  राजेश बनसोडे, उपायुक्त  मिलिंद मोहिते, एसीपी संगिता आल्फान्सो शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक  संतोष पांढरे, पोलीस निरिक्षक निलकंठ जगताप, पोलीस निरीक्षक  संपतराव राऊत  पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, प्रदिप शितोळे, सारस साळवी, महेश जाधव यांनी ही कामगिरी  केली.