पुणे : पुणे शहरातील धनकवडी परिसरात २० ते २५ वाहनांची दोन गुंडांकडून तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे धनकवडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडी परिसरातील केशव कॉम्प्लेक्स,सरस्वती चौक, नवनाथनगर या भागात रात्री 11 ते 1 वाजण्याच्या सुमारास दोन गुंडाकडून रिक्षा,कार,स्कूल बस,पियागो टेम्पो असे एकूण २० ते २५ या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील आरोपींची नाव समोर येत आहे. आम्ही लवकरच आरोपीपर्यंत पोहोचू,असे त्यांनी सांगितले.